CS Foundation Result 2020 for December Exam declared: परिक्षार्थ्यांना ICSI निकाल, मार्क्स icsi.edu वर ऑनलाईन असा पाहता येणार

आज या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आहे.

Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

The Institute of Company Secretaries of India कडून आज (18 जानेवारी) डिसेंबर महिन्यातील CS Foundation result 2020 जाहीर करण्यात आला आहे. सकाळी 11च्या सुमारास हा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षार्थी त्यांचे गुण icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. दरम्यान यंदा CS Foundation 2020 exam डिसेंबर महिन्यात 26 आणि 27 तारखेला झाल्या होत्या. आज या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागणार आहे. नक्की वाचा: ICSI CS June 2021 Exam चं वेळापत्रक Icsi.edu वर जाहीर; इथे पहा नव्या, जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या तारखा.

CS Foundation result 2020 कसा पहाल?

दरम्यान यंदा ICSI result 2020 निकालानंतर विद्यार्थ्यांना फॉर्मल ई रिझल्ट म्हणजेच मार्क्स स्टेटमेंट डाऊनलोड करता येणार आहे. यंदा निकालाची कोणतीही गुणपत्रिका फिजिकल कॉपीच्या माध्यमातून दिली जाणार नाही. अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान आज जाहीर करण्यात आलेल्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, परीक्षेचे नाव, रोल नंबर, क्वालिफाईंग स्टेट्स, प्रत्येक विषयानुसार मार्क्स आणि ऑव्हर ऑल मार्क्स देण्यात आले आहेत.