CBSE’s Revaluation Process for Class 12: सीबीएसई बोर्ड बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून मार्कांच्या गुणपडताळणी साठी प्रक्रिया सुरू; जाणून घ्या कशी आहे नवी प्रक्रिया

सीबीएसई ने दिलेल्या वेळापत्रकानुसार, 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्या विषयाच्या मार्कांसाठी रि व्हॅल्युएशन करायचे आहे त्याची आधी उत्तर पत्रिका फोटोकॉपी घ्यावी लागणार आहे.

CBSE | Twitter

सीबीएसई बोर्डाचे (CBSE Board) दहावी, बारावीचे निकाल 13 मे दिवशी जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये यंदा अपेक्षित मार्क्स न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पडताळण्याची, पुन्हा मुल्यांकन करण्याची संधी बोर्डाने दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2025 पासून ही रि व्हॅल्युएशन ची प्रक्रिया बदलण्यात आली आहे. यंदा नव्या वर्षापासून बदलण्यात आलेल्या प्रक्रियेनुसार दोन टप्प्यांत ही प्रक्रिया पार पडली जाईल आणि त्यामध्ये आधी उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी घेतली जाईल आणि नंतर गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. cbse.gov.in वर त्यासाठी सारी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. नक्की वाचा: CBSE Results 2025: सीबीएसई बोर्डाने निकाल जाहीर करण्यापूर्वी केली महत्त्वाची घोषणा; verification, re-evaluation करणार्‍या विद्यार्थ्यांना होणार फायदा. 

सीबीएसई च्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची गुण पडताळणी प्रक्रिया कशी?

दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. आज 21 मे पासून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही गुणपडताळणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सीबीएसई ने दिलेल्या वेळापत्रकानुसार, 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्या विषयाच्या मार्कांसाठी रि व्हॅल्युएशन करायचे आहे त्याची आधी उत्तर पत्रिका फोटोकॉपी घ्यावी लागणार आहे. 12वीचे विद्यार्थी 21 मे ते 27 मे दरम्यान फोटोकॉपी घेऊ शकतात. प्रत्येक विषयाच्या स्कॅन कॉपी साठी 700 रूपये मोजावे लागणार आहेत.

व्हेरिफिकेशन आणि रिव्हॅल्युएशन करण्यासाठी 28 मे ते 3 जून पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. व्हेरिफिकेशन साठी प्रत्येक विषयाच्या गुणपत्रिकेसाठी 500 रूपये मोजावे लागतील तर रिइव्हॅल्युएशन साठी प्रति प्रश्न 100 रूपये मोजावे लागणार आहेत. इथे पहा सविस्तर नोटीस .

यंदा ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार नाही. पेमेंट देखील ऑनलाईन स्वरूपातच करावं लागणार आहे. या प्रक्रियेमध्ये मार्क्स कमी देखील होऊ शकतात. त्यांना नव्याने कमी झालेले मार्क्स स्वीकारावे लागणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement