CBSE Board Exams 2020 Update: देशातील कोरोना व्हायरस, Lockdown स्थिती सामान्य झाल्यावरच सीबीएसई बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार- केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल
मी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, सीबीएसई परीक्षा सीओव्हीआयडी 19 च्या उद्रेकामुळे घेण्यात आल्या नव्हत्या. देशातील परिस्थिती सामान्य झाल्यावरच त्या घेण्यात येईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) परीक्षा कधी आणि कशा घेतल्या जाणार याबाबत असलेल्या उत्सुकतेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री (Union HRD Minister) रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांनी पूर्णविराम दिला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) आदींमुळे देशात निर्माण झालेली स्थिती सामान्य झाल्यावरच सीबीएसई बोर्ड परिक्षा घेण्यात येतील असे पोखरियाल यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबात वृत्त दिले आहे.
केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सीबीएसई परीक्षांबाबत काल (28 एप्रिल) मी राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. मी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, सीबीएसई परीक्षा सीओव्हीआयडी 19 च्या उद्रेकामुळे घेण्यात आल्या नव्हत्या. देशातील परिस्थिती सामान्य झाल्यावरच त्या घेण्यात येईल. (हेही वाचा, CBSE Board Exams 2020 Update: 10वी, 12 वीच्या स्थगित केलेल्या 29 विषयांच्या परीक्षांबाबत लॉकडाऊन संपल्यानंतरच विचार होणार!)
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या आधीच एक परिपत्रक काढून माहिती दिली होती. या पत्रकानुसार देशातील सीबीएसई अभ्यासक्रमातील तब्बल 29 विषयांच्या परीक्षा स्थगित झाल्या आहेत. या परीक्षा 1 एप्रिलपासून स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आल्यावर आणि लॉकडाऊन नंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच परीक्षांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे या परिपत्रकात म्हटले होते.