CBSE Compartment Result 2022 Date: सीबीएसई बोर्डाच्या 10वी,12वी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 7 सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता; cbse.gov.in वर पहा गुण

CBSE बोर्ड जेव्हा कंपार्टमेंट निकाल 2022 जाहीर करेल तेव्हा तो अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे.

Exam Result | (File Image)

सीबीएसई बोर्ड (CBSE Board) कडून यंदा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल (Compartment Result )आता लवकरच जाहीर होणार आहे. या निकालाबाबत एक तातपुरते वेळापत्रक बोर्डाने जारी केले आहे त्यामध्ये CBSE ने 10वी आणि 12वीच्या गुणांची पडताळणी आणि कंपार्टमेंट निकालाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी तात्पुरते वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार आता 7 सप्टेंबरला निकाल जाहीर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अद्याप या निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

CBSE बोर्ड जेव्हा कंपार्टमेंट निकाल 2022 जाहीर करेल तेव्हा तो अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे. सोबतच cbseresults.nic.in आणि parikshasangam.cbse.gov.in वरही निकाल पाहता येणार आहे.

CBSE बोर्ड  कंपार्टमेंट निकाल 2022 कसा पहाल ?

सीबीएसई बोर्डाने यंदा 10वीची कंपार्टमेंट परीक्षा 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान घेतली आहे तर 12वी ची परीक्षा 23 ऑगस्ट दिवशी घेतली आहे. आता या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. यंदा कोविड 19 संकटामुळे 2 टर्म मध्ये 10वी, 12वीची परीक्षा पार पडली होती. त्याचा निकाल बारावीचा 92.71% आणि दहावीचा 94.40% लागला होता.