CBSE Class 12th Result 2019: हंसिका शुक्ला, करिश्मा अरोरा 500 पैकी 499 गुण मिळवत अव्वल

या तिघीही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गौरांगी चावला ( निर्मल आश्रम दीप माला पब्लिक स्कूल ऋषिकेश), ऐश्वर्या (केंद्रीय विद्यालय राय बरेली), भव्या (बीआरेसके इंटरनेशनल पब्लिक स्कूल हरियाणा) अशा या तिघींची नावे आहेत.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

CBSE 12th Result 2019 : सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षा निकाल आज (2 मे 2019) जाहीर झाला. निकालानुसार या परीक्षेत 83.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे मुलांच्या तुलनेत मुलींना बाजी मारली. अव्वल क्रमांकातही मुलींचाच वरचष्मा राहिला. 499 गुण मिळवत हंसिका शुक्ला डीएसपी मेरठ रोड गाजियाबाद, करिश्मा अरोरा एसडी पब्लिक स्कूल मुजफ्फर नगर (यूपी) 499 आणि लावण्या बालकृष्णन हिने PWD विभागात 489 गुण मिळवत अव्वल स्थान मिळविले.

CBSE Board इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल तुम्ही cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर पाहू शकता. या परीतक्षेत एकूण 83.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 15 फेब्रुवारी 2015 ते 4 एप्रिल 2015 या कालावधीत ही परीक्षा पार पडली. सीबीएसी परीक्षेसाठी 10 आणि 12 वी परीक्षेसाठी 31 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

CBSE Topper Hansika Marksheet

हंसिका शुक्ला या विद्यार्थीनीला 500 पैकी 499 गुण मिळाले. आर्ट्स ट्रीमच्या हंसिकाने इंग्रजीत 99 गुण मिळवले आहेत. तर, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, हिंदुस्थानी वोकलमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळाले आहेत. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत हंसिकाने सांगितले की ती मानसशास्त्र या विषयात ऑनर्स करु इच्छिते. विशेष म्हणजे तीने शाळेव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे अधिक तास (ट्युशन ) लावली नव्हती. (हेही वाचा, CBSE Board 12th Result 2019: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; cbse.nic.in पहा निकाल)

एएनआय ट्विट

दरम्यान, या परीक्षेत 498 मार्क्स मिळविणाऱ्या तीन मुली आहेत. या तिघीही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गौरांगी चावला ( निर्मल आश्रम दीप माला पब्लिक स्कूल ऋषिकेश), ऐश्वर्या (केंद्रीय विद्यालय राय बरेली), भव्या (बीआरेसके इंटरनेशनल पब्लिक स्कूल हरियाणा) अशा या तिघींची नावे आहेत.

एएनआय ट्विट

दरम्यान, त्रिवेंद्रम विभागातून - 98.2 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चेन्नई - 92.93, दिल्ली - 91.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, परीक्षेला बसलेल्या एकूण मुलींपैकी 88.70 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. दुसऱ्या बाजूला या परीक्षेला बसलेल्या एकूण मुलांपैकी 79.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.