CBSE Class 10th, 12th New Exam Pattern: शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये 'सीबीएसई' च्या प्रश्नपत्रिका, गुणपद्धती आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांमध्ये बदल
विद्यार्थ्यांना Critical Thinking आणि Reasoning Abilities या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी हे बदल सुचवण्यात आले आहेत.
CBSE Board Revised Marking System: दिवसेंदिवस स्पर्धात्मक होत चाललेल्या युगामध्ये विद्यार्थ्यांना टिकून राहता यावे यासाठी आता शालेय स्तरापासून विविध उपयोजना राबवण्यात येत आहेत. यंदा सीबीएसई बोर्डानेही त्यांच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना Critical Thinking आणि Reasoning Abilities या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी हे बदल सुचवण्यात आले आहेत. 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी हे नवे बदल लागू करण्यात येणार आहेत. MSBSHSE SSC Exam 2020: महाराष्ट्र बोर्डची 10 वी परीक्षा यंदा 3 मार्च पासून; परीक्षा आणि गुण पद्धतीमध्ये यंदा होणारे 'हे' बदल.
सीबीएसई बोर्डाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बदल?
- आता प्रश्नपत्रिकेमध्ये 20% प्रश्न हे बहुविकल्पीय असतील तर 10% रचनात्मक आहेत. सार्या प्रश्नांच्या 33% मध्ये इंटर्नल ऑप्शन असेल.
- आता प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न 25% बहुपर्यायी असेल. तसेच ज्या विषयामध्ये प्रॅक्टिकल नसेल त्या विषयाची आता इंटरनल असेसमेंट असेल. ही असेसमेंट 20 मार्कांची असेल.
- 10 वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून 33% गुण आवश्यक आहेत.
- 12वी मध्ये 70 मार्कांच्या विषयांमध्ये 23 तर 80 मार्कांच्या विषयामध्ये 26 गुण असणं आवश्यक आहे.
2020 मध्ये होणार्या 10वी आणि 12 वी परीक्षांसाठी हे नियम लागू राहणार आहेत. यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडूनही अशाचप्रकारे बदल करण्यात आले आहेत. 10 वी नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेताना प्रत्येक बोर्डाची मूल्यमापन करण्याची पद्धती वेगवेगळी असल्याने अनेकदा राज्य शिक्षण बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असा वाद रंगतो. त्यामुळे यंदा बोर्डाकडून सुरूवातीपासूनच काळजी घेतली जात आहे.