CBSE 10th, 12th Board Exam 2020 Dates: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर cbse.nic.in वरून करा डाऊनलोड!

सीबीएसई बोर्डाच्या सार्‍या विषयांच्या परीक्षा न घेता आता केवळ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांचे नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस संकटामुळे लांबणीवर पडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये या नव्या वेळापत्रकाबद्दल उत्सुकता होती. आज (18 मे) दिवशी cbse.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आता नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता या नव्या वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सार्‍या विषयांच्या परीक्षा न घेता आता केवळ महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांचे नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये 29 मेजर सब्जेक्ट्सचा समावेश असेल. 1 जुलैला होम सायन्सच्या विषयापासून या परीक्षांना सुरूवात होणार आहे. Coronavirus Impact: CBSE पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवणार; सरकारने दिले आदेश

दरम्यान शनिवारी जाहीर होणारं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जेईई मेन्स, अ‍ॅडव्हांस आणि नीट 2020 परीक्षांचं वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर  12 वीचे सारे पेपर सुरळीत पडले आहेत. मात्र 10 वीचा एक पेपर रद्द करण्यात आला आहे. आता लवकरच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 12 वी परीक्षा वेळापत्रक

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी परीक्षा वेळापत्रक

बोर्ड परिक्षा 2020 चं वेळापत्रक आता नव्याने जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सारा अभ्यास रिव्हाईस करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 9वी आणि 11 वी मध्ये नापास झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी एक संधी देखील दिली आहे. शाळांमार्फत आता ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.