CBSE Class 10 Result 2021 Declared: सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; cbse.gov.in आणि cbse.nic.in वर असे पहा तुमचे मार्क्स!
बोर्डाने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने आज निकाल ऑनलाईन उपलब्ध केला आहे.
सीबीएससी बोर्डाने (CBSE Board) काही दिवसांपूर्वी 12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर आज (3 ऑगस्ट) दहावीचा निकाल (CBSE Class 10 Result) देखील जाहीर केला आहे. सीबीएसईचे 10 वीचे 99.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी बोर्ड परीक्षांचे निकाल स्पेशल आहेत कारण परीक्षांविना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने हे निकाल जाहीर केले जात आहेत. सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना यंदा 20 मार्क्स प्रॅक्टिकल्स, 80 मार्क्स हे लेखी परीक्षा आणि 10 मार्क्स युनिट टेस्ट, 30 मार्क्स मिड टर्म परीक्षा आणि 40 मार्क्स प्री बोर्ड परीक्षांसाठी विभागून देण्यात आले आहेत. आता विद्यार्थी त्यांचे अंतिम निकाल cbse.gov.in आणि cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दरम्यान संकेतस्थळांसोबतच यंदा विद्यार्थ्यांना Umang App, Digilocker app, SMS द्वारा पाहता येणार आहे. परीक्षा न झाल्याने अॅडमीट कार्ड्स दिली नसल्याने अनेकांना त्यांचे रोल नंबर्स ठाऊक नाहीत अशांसाठी बोर्डाने वेबसाईट्सवरच CBSE 10th result roll number finder उपलब्ध करून दिला आहे. त्यावर तुम्ही रोल नंबर पाहू शकतात.
सीबीएससी बोर्डाचे दहावीचे विद्यार्थी कसे पाहू शकतील निकाल ऑनलाईन?
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर registration number, roll number आणि इतर log-in credentials भरा.
- तुम्हांला स्क्रिन वर निकाल पाहता येईल.
- हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.
DigiLocker वर निकाल पाहण्यासाठी
सीबीएसई बोर्डाकडून आज यंदा दहावीच्या निकालामध्ये 18 लाख विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याने त्यांचा निकाल लावण्याचे आव्हान होते. काही विद्यार्थ्यांसाठी काही विषयांचे पेपर रद्द झाले आहेत. अनेक विद्यार्थी किमान 3 विषयांचे पेपर दिले आहेत. या 3 विषयांच्या कामगिरीवर बोर्ड आजचा निकाल जाहीर करत आहेत. तर रद्द झालेल्या विषयांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी pre-board, mid-term आणि pre-board examination यांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.