CBSE Board 10th Results 2019: सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार निकालाचं सरप्राईज, निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

सीबीएसई बोर्डाने कोणतीही पूर्व कलपना न देता बारावी बोर्डाचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला त्यानंतर उद्या म्हणजेच 5 मे ला धावायचा देखील निकाल जाहीर करण्यात येईल अशी चर्चा ऐकू येत होती मात्र यंदा दहावीचा निकाल देखील अचानक घोषित करून विद्यार्थ्यांना सरप्राईज देण्याचे बोर्डाने ठरवले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

CBSE 10th Results 2019 Date: बारावीच्या निकालानंतर आता सीबीएसई (CBSE)च्या दहावीच्या (10th Result)  विद्यार्थ्यांना देखील निकालाची प्रतीक्षा लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून दहावीचा निकाल हा उद्या म्हणजेच  5 मे 2019 ला लागणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र बोर्डातील प्रवक्त्या रमा शर्मा (Rama Sharma) यांनी NDTV ला दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या निकाल देखील बारावी प्रमाणे कोणतीही तारीख आधीच उघड न करता अचानक लावण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बोर्डाने निकालाचे सरप्राईज द्यायचं ठरवलंय असा म्हणता येईल.

याचसोबत आता निकाल कोणत्याही दिवशी लागू शकत असल्याने विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संबंधित वेबसाईट्स तपासात राहाव्यात असा इशारा ही बोर्डातर्फे देण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दिलेले  विद्यार्थी   cbseresults.nic.in, examresults.in,  indiaresults.com,  results.gov.inकिंवा  cbse.nic.in  या साईटवर आपला निकाल तपासू शकतात. Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

निकाल पाहण्यासाठी खालील प्रमाणे चार सोप्प्या स्टेप्स फॉलो करा.

यंदा जवळपास 18.19 लाख विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती सीबीएसई बोर्डाच्या माहितीनुसार या सर्व दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी झालेली असून येत्या काहीच दिवसात निकाल जाहीर करण्यात येईल.