CBSE Board Result 2022: सीबीएसई बोर्ड बारावीचा निकाल cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS द्वारा कसा पहाल?
शाळांना निकाल Pariksha Sangam portal वरून डाऊनलोड करण्याची सोय आहे. विद्यार्थ्यी त्यांच्या निकालांसाठी शाळांना देखील भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
The Central Board of Secondary Education अर्थात सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर केला आहे. पूर्वकल्पना न देता यंदा थेट निकाल जाहीर करत बोर्डाने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना धक्का दिला आहे. यंदा कोविड 19 संकटामुळे सीबीएसई बोर्डाने 2 टर्म मध्ये परीक्षा घेतल्या होत्या आणि आज निकाल जाहीर केला आहे. CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल 92.71 % लागला आहे. यंदा परीक्षेला 14,35,366 विद्यार्थी सामोरे गेले होते. यंदाही मुलींनी निकालामध्ये बाजी मारली आहे. मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना सीबीएसई बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा होती. बोर्डाच्या निकालावर पुढे अनेक प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. त्यामुळे आज (22 जुलै) जाहीर झालेला 12वीचा निकाल ऑनलाईन कसा बघायचा हे नक्की जाणून घ्या.
सीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल
विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS तसेच आयव्हीआरएस सेवेच्या माध्यमातूनही पाहता येणार आहे. मग नेमका तुमचा निकाल या विविध पर्यायांवर पाहण्यासाठी काय सोय आहे? हे इथे नक्की जाणून घ्या. नक्की पहा: CBSE Class 12th Result 2022 जाहीर होताच ट्वीटर वर मजेशीर Memes, Jokes, GIFs सह फोटोंचा पाऊस.
cbseresults.nic.in वर निकाल कसा पहाल?
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
त्यानंतर registration number, roll number आणि इतर log-in credentials भरा.
तुम्हांला स्क्रिन वर निकाल पाहता येईल.
हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.
Umang App वर सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा पहाल?
Umang App डाऊनलोड करा.
पर्यायामधून CBSE निवडा.
तुमचे credentials टाका.
निकाल पहा, सेव्ह करा, डाऊनलोड करून ठेवा.
Digilocker App वर सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा पहाल?
Digilocker App डाऊनलोड करा.
‘Access DigiLocker.’ वर क्लिक करा. तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
एज्युकेशन खाली दिलेल्या सीबीएसई वर क्लिक करा.
इथे तुम्हांला बारावीचा निकाल पाहण्यासाठी पर्याय दिसेल.
रोल नंबर टाकून तुम्ही निकाल पाहू शकता.
SMS द्वारा सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा पहाल?
SMS टाईप करून 7738299899 वर मेसेज सेंड करा.
शाळांना निकाल Pariksha Sangam portal वरून डाऊनलोड करण्याची सोय आहे. विद्यार्थ्यी त्यांच्या निकालांसाठी शाळांना देखील भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)