CBSE Board Result 2021: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल दुपारी 2 वाजता cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS द्वारा कसा पहाल?
त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% असे होईल.
देशभरात राज्य शिक्षण मंडळाचे निकाल जाहीर होत असताना सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) विद्यार्थ्यांना, पालकांनाही त्यांच्या निकालाची उत्सुकता होती. यंदा कोविड 19 मुळे परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने सीबीएसई बोर्ड देखील त्यांचे 10वी,12वीचे निकाल लावणार आहे. त्यामुळे या निकालाबाबत सार्यांनाच उत्सुकता आहे. आज सीबीएसई बोर्ड दुपारी 2 वाजता इयत्ता 12वीचा निकाल (CBSE Board Class 12th Result 2021) ऑनलाईन जाहीर करणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS तसेच आयव्हीआरएस सेवेच्या माध्यमातूनही पाहता येणार आहे. मग नेमका तुमचा निकाल या विविध पर्यायांवर पाहण्यासाठी काय सोय आहे? हे इथे नक्की जाणून घ्या.
दरम्यान 10वी,12वी चे निकाल पाहण्यासाठी यंदा तुमचा रोल नंबर तुम्हांला माहित असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे रोल नंबर नसेल तर CBSE 10th, 12th Roll Number 2021 या डिरेक्ट लिंकवर काही माहिती भरून तुमचा रोल नंबर पाहू शकता.
cbseresults.nic.in वर निकाल कसा पहाल?
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
त्यानंतर registration number, roll number आणि इतर log-in credentials भरा.
तुम्हांला स्क्रिन वर निकाल पाहता येईल.
हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.
Umang App वर सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा पहाल?
Umang App डाऊनलोड करा.
पर्यायामधून CBSE निवडा.
तुमचे credentials टाका.
निकाल पहा, सेव्ह करा, डाऊनलोड करून ठेवा.
Digilocker App वर सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा पहाल?
Digilocker App डाऊनलोड करा.
‘Access DigiLocker.’ वर क्लिक करा. तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
एज्युकेशन खाली दिलेल्या सीबीएसई वर क्लिक करा.
इथे तुम्हांला बारावीचा निकाल पाहण्यासाठी पर्याय दिसेल.
रोल नंबर टाकून तुम्ही निकाल पाहू शकता.
SMS द्वारा सीबीएसई बोर्डाचा निकाल कसा पहाल?
SMS टाईप करून 7738299899 वर मेसेज सेंड करा.
यंदा सीबीएसईचा 12वीचा निकाल 40:30:30 या फॉर्म्युलावर आहे. त्यामध्ये 12 वी प्री बोर्ड एक्झामचे अंतर्गत मुल्यमापन 40% , 10 वीचा परफॉर्मन्स 30%, 11वीचा परफॉर्मन्स 30% असे होईल. जे विद्यार्थी या फॉर्म्युला नुसार मिळालेल्या मार्क्स ने खुष नसतील त्यांना श्रेणी सुधारण्यासाठी कोविड स्थिती सुधारल्यानंतर होणारी परीक्षा देता येईल. अशी माहिती बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती.