CBSE Board Exams 2021: सीबीएसई च्या 10वी, 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा, रद्द करण्याचा अद्याप विचार नाही, बोर्डाच्या अधिकार्‍यांची माहिती

40-50% अधिक परीक्षा केंद्र वाढवली जाणार आहेत. यामुळे सोशल डिस्टंसिंग ठेवता येणार आहे.

Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह देशभर पुन्हा वाढणारी कोरोना रूग्णसंख्या पाहता आता पालकांच्या, शिक्षकांच्या अअणि विद्यार्थ्यांच्या मनातही यंदांच्या बोर्ड परीक्षांना कोरोना सावटाखाली सामोरं कसं जायचं? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान राज्यात शिक्षण मंडळाकडून पर्यायी परीक्षेच्या स्वरूपाची चाचपणी होत असताना आता सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) परीक्षे वेळापत्रकानुसारच होईल असे म्हटलं आहे. यंदा देशभर सीबीएसई बोर्डाची 10वी, 12वीची परीक्षा 4 मे पासून सुरू होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सध्या तरी सीबीएसई बोर्ड त्यांच्या 10वी, 12वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या विचारात नाही.

सध्या देशभरातून काही विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ऑनलाईन पिटिशन साईन करून त्याची मागणी केली आहे. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. Change.org वर करण्यात आलेल्या पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांचं असं मत आहे की, ' एकीकडे कोरोना रूग्ण काही हजार असताना परीक्षा रद्द झाल्या होत्या पण आता कोरोना रूग्णसंख्या वाढ ही उच्चांकी असताना परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे. यावर शिक्षण मंत्र्यांनी विचार करावा.

PTI सोबत बोलताना सीबीएसई च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता परीक्षा केंद्रांवर अधिक खबरदारी घेतली जाणार आहे. 40-50% अधिक परीक्षा केंद्र वाढवली जाणार आहेत. यामुळे सोशल डिस्टंसिंग ठेवता येणार आहे. CBSE यंदा 10वी, 12वीच्या COVID-19 Positive विद्यार्थ्यांच्या Practical Exam पुढे ढकलणार असल्याचं वृत्त बोर्डाच्या प्रवक्त्यांनी फेटाळलं.

दरम्यान मागील आठवड्यामध्ये सीबीएससी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, जर सध्या सुरू असलेल्या प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये कोणी विद्यार्थी त्याच्या किंवा कुटुंबियांच्या कोविड 19 बाधित असल्याने येऊ शकला नाही तर त्याची पुन्हा परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. दरवर्षी सीबीएसई जानेवारी महिन्यात प्रॅक्टिकल आणि फेब्रुवारी - मार्च महिन्यात लेखी परीक्षा घेते. पण यंदा कोरोना वायरसमुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा मे-जून महिन्यात होणार आहेत.