CBSE 12th Compartment Result 2022 Declared: सीबीएसई बोर्डाने 12वीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल results.cbse.nic.in वर केला जाहीर
CBSE बोर्डाचे विद्यार्थी त्यांचा निकाल results.cbse.nic.in, results.gov.in, आणि cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत.
सीबीएसई बोर्डाकडून 12वीचा कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल (CBSE 12th Compartment Result) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल results.cbse.nic.in, results.gov.in, आणि cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. 23 ऑगस्ट पासून 12वीची कंपार्टमेंट परीक्षा बोर्डाकडून घेण्यात आली होती आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे.
आज सीबीएसई बोर्डाने 12वी च्या कंपार्टमेंट परीक्षा निकालासोबतच केवळ एका विषयाच्या improvement साठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाच्या गुणांच्या पडताळणीची प्रक्रिया बोर्ड 9 सप्टेंबर पासून सुरू करणार आहे.
CBSE बोर्ड कंपार्टमेंट निकाल 2022 कसा पहाल ?
- सीबीएसई बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी results.cbse.nic.in ला भेट द्या.
- त्यानंतर 10वी, 12वी च्या कंपार्टमेंट निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
- तुम्हांला लॉगिन करण्यासाठी विचारलेले काही तपशील टाका.
- तुमची मार्क शीट आता तुम्ही पाहू शकाल. ती सेव्ह करून डाऊनलोड किंवा प्रिंट देखील करण्याचा पर्याय आहे.
इथे पहा CBSE बोर्ड कंपार्टमेंट निकाल 2022 ची डिरेक्ट लिंक
आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या मार्क्सचं व्हेरिफिकेशन, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन यासाठी अर्ज करू शकतात. आज 12वीच्या निकालानंतर आता 10 वी च्या विद्यार्थ्यांनादेखील त्यांच्या परीक्षा निकालाची उत्सुकता लागली आहे.