CBSE Board 10th Result 2019: इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षा निकाल आज दुपारी तीन नंतर cbse.nic.in वर उपलब्ध
cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
Central Board of Secondary Education म्हणजेच सीबीएसईचा (CBSE) बोर्डाचा इयत्ता दहावीचा (10th Result) निकाल आज, 6 मे रोजी दुपारी तीन वाजता लागणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in, वर पाहता येईल. यंदा जवळपास 18.19 लाख विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मागील काही दिवसांपासून ५ मे ला निकाल लागणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र त्यावर बोर्डाच्या प्रवक्त्या रमा शर्मा यांने रॉक लावत यंदा बारावी प्रमाणे दहावीचा निकाल देखील अचानक लावून सरप्राईज देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?
ANI ट्विट
कुठे तपासू शकता निकाल
results.gov.in. किंवा cbse.nic.in या साईटवर आपला निकाल तपासू शकतात
कसा पहाल CBSE चा 10 वीचा निकाल
- दुपारी तीन वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in उघडा.
- होम पेज वरील दहावी इयत्तेचा निकाल पाहण्यासाठी Class 10 Result 2019 वर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, रोल नंबर व प्रवेशपत्रावरील योग्य ती माहिती नेमून दिलेल्या रकान्यात भरा, आणि सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल त्यातील मार्क्स व आपले नाव तपासून घेऊन मग त्याची प्रिंट काढा.
यंदा CBSE बोर्डाने परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठीचे निकष कमी केले होते . बोर्डानुसार, पास होण्यासाठी यात विद्यार्थ्यांना इंटरनल आणि एक्सटर्नल असे वेगळे 33% मिळवण्याची गरज नाही असे सांगण्यात आले होते.