NEET UG 2024 Row: नीट पेपर फूटीप्रकरणात CBI ला मोठे यश; पाटणा येथून दोघांना अटक
मनीष कुमार आणि आशुतोष कुमार यांनी कथितरित्या परीक्षेपूर्वी उमेदवारांना सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती, जिथे त्यांना लीक झालेले पेपरची उत्तरसूची देण्यात आली होती. NEET पेपर लीक प्रकरणी सीबीआयने सहा एफआयआर नोंदवले आहेत.
NEET UG 2024 Row: राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआय (CBI) च्या पथकाने पाटणा येथे दोघांना अटक केली आहे. मनीष प्रकाश आणि आशुतोष कुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनीष कुमार आणि आशुतोष कुमार यांनी कथितरित्या परीक्षेपूर्वी उमेदवारांना सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती, जिथे त्यांना लीक झालेले पेपरची उत्तरसूची देण्यात आली होती. NEET पेपर लीक प्रकरणी सीबीआयने सहा एफआयआर नोंदवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष प्रकाश हा त्याच्या कारमधून विद्यार्थ्यांना घेऊन जाणे तसेच सोडण्याचे काम करत असे. तसेच आशुतोषच्या घरी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आत्तापर्यंत NEET परीक्षा प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI टीमने पहिली अटक केली आहे. आता सीबीआयने दोघांनाही न्यायालयात हजर केले आहे. (हेही वाचा - NEET Paper Leak Case: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नीट घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आता CBI करणार)
देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे NEET-UG आयोजित केले जाते. यंदाची परीक्षा 5 मे रोजी 14 परदेशी शहरांसह 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर घेण्यात आली. (हेही वाचा - Police Lathichar on Indian Youth Congress Protest: NEET मुद्द्यावरून भारतीय युवक काँग्रेसकडून जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार (Watch Video))
दरम्यान, NEET परीक्षा 5 मे रोजी 14 परदेशी शहरांसह 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. सीबीआयचा पहिला एफआयआर रविवारी दाखल करण्यात आला.