CA November Result 2020 declared: सीए च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर; icai.org वर असे पहा गुण

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांना त्यांचे निकाल ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.org वर ते पाहता येणार आहेत.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

ICAI कडून आज CA November Result 2020 जाहीर झाला आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांना त्यांचे निकाल ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.org वर ते पाहता येणार आहेत. यंदा सीए नोव्हेंबर परीक्षा 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान पार पडली आहे. फाऊंडेशन कोर्सची परीक्षा 8-14 डिसेंबर तर फायनल कोर्स परीक्षा 21 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरच्या काळात पार पडली आहे. इंटरमेडिएट एक्झाम 22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडली आहे. आजच्या निकालासोबतच लेखी परीक्षेसोबत टॉप 50 यशस्वी विद्यार्थ्यांची ऑन इंडिया मेरीट लिस्ट देखील जाहीर होणार आहे.

सीए चा  निकाल  कसा पहाल ऑनलाईन?

icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

होमपेजवर CA November Result 2020 ची लिंक तुम्हांला दिसेल त्यावर क्लिक करा.

तुम्ही नव्या पेज वर रिडिरेक्ट व्हाल तेथे तुम्हांला लॉगिंग डिटेल्स टाकावे लागतील.

त्यानंतर तुमचा निकाल तुम्ही स्क्रिनवर पाहू शकाल.

हा निकाल डाऊनलोड करून ठेवा. भविष्यात तुम्हांला त्याची गरज पडल्यास वापरता येऊ शकेल.

एमएसएम द्वारा निकाल पाहण्यासाठी

ICAI च्या पूर्वीच्या नोटिफिकेशननुसार, एसएमेसद्वारा निकाल पाहण्यासाठी

जुन्या अभ्यासक्रमाच्या फायनल एक्झाम विद्यार्थ्यांसाठी

CAFNLOLD (space) XXXXXX (सहा डिजिट रोल नंबर)

नव्या अभ्यासक्रमाच्या फायनल एक्झाम विद्यार्थ्यांसाठी

CAFNLNEW (space) XXXXXX (सहा डिजिट रोल नंबर)

हे मेसेज 57575 या नंबर वर पाठवायचे आहेत.

दरम्यान सीएचा हा निकाल icaiexam.icai.org,caresults.icai.org,icai.nic.in या अन्य वेबसाईट्स वर देखील पाहता येणार आहे.