CA Foundation December 2021 Exams: ICAI कडून Registration Deadline 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
विद्यार्थ्यांना ICAI CA December foundation exam ला सामोरं जाण्यासाठी इयत्ता बारावीची एक्झाम मार्क शीट सादर करावं लागणार आहे. याकरिता 10 सप्टेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
Institute of Chartered Accountants of India कडून विद्यार्थ्यांसाठी सीए फाऊंडेशन परीक्षेच्या बाबतीत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. यंदा डिसेंबर महिन्यात होणार्या या परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याबबतचे नोटीफिकेशन अधिकृत वेबसाईट icai.org वर जारी करण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत डिसेंबर महिन्यात होणार्या या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे. नक्की वाचा: ICSI CS Foundation Admit Card 2021 जारी; icsi.edu वरून असं करा डाऊनलोड.
विद्यार्थ्यांना ICAI CA December foundation exam ला सामोरं जाण्यासाठी इयत्ता बारावीची एक्झाम मार्क शीट सादर करावं लागणार आहे. याकरिता 10 सप्टेंबर पर्यंत वेळ देण्यात आला आहे. यंदा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी देखील परीक्षा देऊ शकणार आहेत.
ICAI CA Foundation Exam 2021 साठी रजिस्ट्रेशन कधी कराल?
अधिकृत वेबसाईट icai.org ला भेट द्या.
तुमचे credentials पाहून सीए पोर्टल वर लॉगिंग करा.
त्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरू शकता.
त्यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा.
यंदा जुलै महिन्यात झालेल्या परिक्षा 5 जुलै ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपूर्वी पूराने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता इचलकरंजी, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांमधील मुलांना संधी मिळावी म्हणून ही मुदतवाढ गरजेची आहे. अद्याप परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)