BSF Recruitment 2019: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सीमा सुरक्षा दल करतंय नोकर भरती, जागा, पात्रता, इतर माहिती घ्या जाणून
वरील पदाच्या पदसंख्येतील तथ्य आणि इतर अधिक माहितीसाठी बीएसएफच्या bsf.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अधिक सोप्या भाषेत सांगायचं तर बीएसएफ (BSF) मध्ये नोकरीची संधी आहे. ज्या युवकांना नोकरी आणि देशसेवा अशा दोन्ही गोष्टी एकत्र साधायच्या आहेत अशा तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. कारण, बीएसएफमध्ये हेड कॉनस्टेबल (Head Constables) पदासाठी भरती निघाली आहे. बीएसएफमध्ये भरती झाल्यानंतर संबंधीत उमेदवाराला देशभरातील कोणत्याही सीमेवर नियुक्त केले जाऊ शकते. जाणून घ्या एकूण जागा, पात्रता आणि इतर माहिती.
पद, पात्रता आणि इतर माहिती
- पद - हेड कॉनस्टेबल
- एकूण जागा - 1072
- मासिक वेतन - 25 हजार रुपये, प्रतिमाह (सेवेत रुजू झाल्यानंतर)
- वयोमर्यादा - 18 वर्षे पूर्ण ते 25 वर्षांपर्यंत.
- पात्रता - अर्जदार उमेदवार हा इयत्ता 12 वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असावा.
(हेही वाचा, खुशखबर! राज्यात पुन्हा होणार ITI ची परीक्षा, 'त्या' विद्यार्थ्यांना दिलास; जाणून घ्या नवे वेळापत्रक)
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वरील पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जून 2019 पर्यंत आहे. वरील पदाच्या पदसंख्येतील तथ्य आणि इतर अधिक माहितीसाठी बीएसएफच्या bsf.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.