7th Pay Commission: सरकारी खात्यात 25 जागांसाठी भरती; उमेदवारांना मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार 34,000 ते 2,09,200 रुपये इतकी वेतनश्रेणी

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदासाठी गोष्ट म्हणजे .यात Level-5 ते Level-12 मध्ये येणा-या उमेदवारास सातव्या वेतन आयोगानुसार, वेतनश्रेणी मिळणार आहे ज्यात साधारण 34,000 ते 2,09,200 रुपये इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सद्य स्थितीत जी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते त्या सरकारी नोकरीच्या अनेक जागांसाठी भरती निघत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) च्या 25 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदासाठी गोष्ट म्हणजे .यात Level-5 ते Level-12 मध्ये येणा-या उमेदवारास सातव्या वेतन आयोगानुसार, वेतनश्रेणी मिळणार आहे ज्यात साधारण 34,000 ते 2,09,200 रुपये इतकी वेतनश्रेणी मिळणार आहे. Zeebiz ने दिलेल्या वृत्तानुसार, इच्छुक उमेदवाराने आपण या पदासाठी पात्र आहोत की नाही यासाठी NHRC च्या nhrc.nic.in.अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

या भरतीत निवडून आलेल्या उमेदवारांची त्यांच्या पात्रतेनुसार, administrative, research, investigation and accounts विभागात नेमणूक करण्यात येईल. 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

पाहा कोणत्या पदांसाठी आहे ही भरती:

1. प्रशासकीय विभाग ( Administrative Division)-10 जागा

a) Librarian/Documentation Officer Level 10- 1 जागा

वेतनश्रेणी- 56,700 ते 1,77,500 रुपये

b) विभाग अधिकारी Level 8 (Section Officer)- 4 जागा

वेतनश्रेणी- 47,600 ते 1,51,100 रुपये

c) कनिष्ठ अनुवादक Level 06 (Junior Translator)- 2 जागा

वेतनश्रेणी- 34,500 ते 1,12,400 रुपये

d) खाजगी सचिव Level 8 (Private Secretary)- 2 जागा

वेतनश्रेणी- 47,600 ते 1,51,100 रुपये

e) वैयक्तिक सहाय्यक Level 07 (Personal Assistant)- 1 जागा

वेतनश्रेणी-44,900 ते 1,42,400 रुपये

2. संशोधन विभाग Level 6 (Research Division)- 7 जागा

a) सहसंचालक Level 12 (Joint Director)- 1 जागा

वेतनश्रेणी-78,800 ते 2,09,200 रुपये

b) वरिष्ठ संशोधन अधिकारी Level 11 (Sr. Research Officer)- 2 जागा

वेतनश्रेणी- 67,700 ते 2,08,700 रुपये

c) वरिष्ठ संशोधन सहाय्यक Level 07 (Sr. Research Assistant)- 1 जागा

वेतनश्रेणी- 44,900 ते 1,42,400 रुपये

d) संशोधन सहाय्यक Level-06(Research Assistant)- 3 जागा

वेतनश्रेणी- 34,500 ते 1,12,400 रुपये

3. अन्वेषण विभाग Level 7 (Investigation Division)- 4 जागा

वेतनश्रेणी-44,900 ते 1,42,400 रुपये

4. लेखा विभाग (Accounts Division)- 4 जागा

a)सहाय्यक लेखा अधिकारी Level 08(Assistant Accounts Officer)- 2 जागा

वेतनश्रेणी-47,600 ते 1,51,100 रुपये

b) कनिष्ठ लेखापाल Level 05 (Junior Accountant)- 2 जागा

वेतनश्रेणी- 29,200 ते 92,300 रुपये

इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC)च्या nhrc.nic.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज भरा.