ED Jharkhand Raid: निवडणुकीच्या धामधुमीत ईडीची मोठी छापेमारी; झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरून शोधून काढला नोटांचा डोंगर (Watch Video)
त्यात ग्राम विकास मंत्री आणि काँग्रेसचे आमदार आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरून पैशांचं घबाड जप्त केलं.
ED Jharkhand Raid:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज सोमवारी रांची (Ranchi), झारखंड (Jharkhand) मधील अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त (Massive Cash Recovered By ED) केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम (Rural Development Minister Alamgir Alam) यांचे स्वीय सचिव संजीव लाल (Sanjiv Lal) यांच्या नोकराच्या घरून ईडीनं मोठी रोकड जप्त केली. 20 ते 30 कोटींच्या घरात ही रोकड असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत नोटांचा डोंगरच निघाल्याने ईडी अधिकाऱ्यांनी पैसे मोजण्यासाठी मशीन मागवल्या आहेत. (हेही वाचा :ED Attached Raj Kundra Properties: राज कुंद्रा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त)
त्याशिवाय, याप्रकरणी ईडीनं झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय, आलमगीर आलम यांच्याशी संबंधीत असलेल्या विभागाची तपासनी केली जात आहे. ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांमधये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.