Ganesh Chaturthi 2022: ओडिशामधील कलाकाराने काचेच्या बाटलीत बनवलेला गणरायाची पर्यावरणपूरक मूर्ती
तो खुर्डा जिल्ह्यातील जाटनी गावातील रहिवासी आहे. राव यांनी आपल्या सर्जनशीलतेने लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे.
Ganesh Chaturthi 2022: आजापासून विघ्नहर्ता गणपतीच्या पूजेचा दहा दिवसीय उत्सव सुरू झाला आहे. आज प्रत्येक घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. अशा स्थितीत विविध आकारातील कलात्मक शिल्पे बाजारात पाहायला मिळत आहेत. भुवनेश्वरमधील एका कलाकाराने गणेश चतुर्थीसाठी बाटलीच्या आत गणेशाची इको-फ्रेंडली मूर्ती (Eco-friendly idol of Lord Ganesh) तयार केली आहे. एल ईश्वर राव, असं या कलाकाराचं नाव आहे. तो खुर्डा जिल्ह्यातील जाटनी गावातील रहिवासी आहे. राव यांनी आपल्या सर्जनशीलतेने लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, कलाकार ईश्वर राव सांगतात, “यावेळी मी 350 मिली बाटलीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवली. ही मातीची कलाकृती बनवायला मला सात दिवस लागले. बाटलीमध्ये कला बनवणे आव्हानात्मक आहे. (हेही वाचा -Ganesh Chaturthi 2022 Wishes: PM Narendra Modi, CM Eknath Shinde यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा)
आज देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असून दहा दिवस गणपतीची पूजा केली जाणार आहे. हा दहा दिवसांचा शुभ उत्सव चतुर्थी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. गणरायाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात झाला.
गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या दिवशी गणेश भक्त उपवास करतात. तसेच आज गणपतीच्या आवडीचे मोदक आणि इतर पदार्थ घरोघरी तयार केले जातात. या उत्सवात लोक बाप्पाची प्रार्थना करतात आणि विधी करतात. दोन वर्षांनंतर गणेशपूजेचा सण साजरा करण्यासाठी लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळात जोरदार तयारी करण्यात आली आहे.