Road Accident in Leh: पूर्व लडाखला जाणारी बस 200 मीटर खोल दरीत कोसळली; 6 ठार, 22 जखमी

मात्र, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Road Accident in Leh (फोटो सौजन्य - ANI)

Road Accident in Leh: केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला. लेहहून पूर्व लडाख (East Ladakh) च्या दिशेने जाणारी बस (Bus) 200 मीटर खोल दरीत (Deep Gorge) कोसळली. दुरबुकजवळ बस दरीत पडल्याने किमान 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 22 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते. ही बस लेहच्या लॅमडन स्कूलची होती. ही बस लेहहून दुरबुकला जात होती.

अपघातात जखमी झालेल्यांना एसएनएम लेहच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. लेहचे आयुक्त संतोष सुकदेवा यांनी सांगितले की, प्रवाशांनी भरलेली बस लेहहून पूर्व लडाखला जात होती. त्याचदरम्यान अपघात झाला. पोलिस प्रशासनाच्या पथकाने मदतकार्य सुरू केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे डॉक्टरांचे एक पथक जखमींवर उपचार करत आहे. (हेही वाचा -Pune Drunk-And-Drive Accident: पुण्यातील मांजरी मुंढवा रोडवर दारूच्या नशेत माजी नगरसेवकाच्या मुलाने दिली टेम्पो ट्रकला धडक; चालक व क्लिनर जखमी, गुन्हा दाखल (Watch Video))

अपघात ठिकाणाहून जखमींना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले रुग्णालयात, पहा व्हिडिओ - 

 

बसमध्ये शाळेचे शिक्षक व कर्मचारी करत होते प्रवास -

अपघात झालेली बस लेह येथील लॅमडन मॉडेल सीनियर सेकेंडरी स्कूलची असल्याचे सांगण्यात येत आहे. या बसमध्ये शाळेतील शिक्षक व कर्मचारी प्रवास करत होते. बस माझदा कंपनीची असून तिचा नोंदणी क्रमांक JK 10A 7004 असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे.