Earthquake In Delhi: राजधानी दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सातत्याने भूकंपाचे झटके बसत आहेत. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरत आहे. गेल्या 2 महिन्यांत दिल्लीमध्ये तब्बल 15 भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Earthquake Tremors (Photo Credits-Pixabay)

Earthquake In Delhi: राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors) जाणवले आहेत. या भूकंपाचे तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र गुरुग्राम हरियानाच्या नैऋत्यकडे 63 कि.मी. अंतरावर होते. यासंदर्भात राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (National Centre for Seismology)  माहिती दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत सातत्याने भूकंपाचे झटके बसत आहेत. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरत आहे. गेल्या 2 महिन्यांत दिल्लीमध्ये तब्बल 15 भूकंपाचे धक्के बसले आहेत. (हेही वाचा - भारतात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 60.73 टक्क्यांवर पोहचला, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांची माहिती)

दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये 12 एप्रिलला 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकपाचा धक्का बसला होता. तेव्हापासून आतापर्यंत 15 वेळा दिल्लीत भूंकपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी आलेल्या भूकंपांचं केंद्र कधी दिल्ली, कधी फरिदाबाद, तर कधी रोहतकमध्ये होते. दरम्यान, आज दुपारी ईशान्य भारतातील मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती.