Earthquake in Bay of Bengal: बंगालच्या उपसागरात भूकंप; 5.1 रिश्टर स्केलवर जाणवले हादरे
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) च्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी ९ वाजून १२ मिनीटांनी हे धक्के जाणवले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाल्याचे वृत्त नाही.
Earthquake in Bay of Bengal: बंगालच्या उपसागराला १ सप्टेंबरची सकाळ हादरवून सोडणारी ठरली. उपसागरात(Bay of Bengal) 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने त्याबाबतची माहिती दिली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. बंगालच्या उपसागराशिवाय, पूर्वी भागात भूकंपाचे(Earthquake) धक्के जाणवले. नागालँडमध्ये सकाळी 3:36 च्या सुमारास 3.3 तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नोकलक टाउन येथे हा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सकाळी 3:36 च्या सुमारास नोकलक भागात 10 किलोमीटरच्या खोलीत होता. (हेही वाचा: Portugal Earthquake: पोर्तुगाल ची राजधानी Lisbon मध्ये 5.4 रिश्टल स्केलचा भूकंप)
5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)