Karnataka’s Mask Advisory: कोरोना रिटर्न्स!! केरळमध्ये कोरोना प्रकरणे वाढल्याने कर्नाटकात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला मास्क लावण्याचा सल्ला

सध्या केरळमध्ये कोविडचा उप-प्रकार JN.1 चे रुग्ण आढळले आहेत.

Mask | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Karnataka’s Mask Advisory: कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी सोमवारी ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला (Mask Advisory) दिला. केरळ (Kerala) आणि इतर राज्यांमध्ये कोविड -19 (Covid-19) प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांनी यासंर्भात सूचना दिल्या. कर्नाटकातील कोडागु येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्री म्हणाले की, 'घाबरण्याची गरज नाही. आम्ही काल एक बैठक घेतली जिथे आम्ही काय पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा केली. आम्ही लवकरच यासंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी करू. ज्यांचे वय 60 वर्षांहून अधिक आहे, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे.'

आम्ही सरकारी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे. केरळची सीमा असलेल्या प्रदेशांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. मंगळूर, चमनाजनगर आणि कोडागुला सतर्क राहणे आवश्यक आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाईल. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांना अनिवार्यपणे चाचण्या कराव्या लागतील, असेही यावेळी मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितलं. (हेही वाचा - New COVID Variant In India: चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतात आढळला कोरोनाचा नवीन JN.1 सबवेरियंट; काय आहेत लक्षण? जाणून घ्या)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोविड-19 सक्रिय प्रकरणांची संख्या सोमवारी 1,828 वर पोहोचली आहे, तर केरळमध्ये एकाच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या केरळमध्ये कोविडचा उप-प्रकार JN.1 चे रुग्ण आढळले आहेत. (हेही वाचा - Covid-19: 'कोविड-19 विषाणू फुफ्फुसात 2 वर्षांपर्यंत राहू शकतो'; अभ्यासात झाला खुलासा)

तथापी, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.46 कोटी (4,44,69,931) झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कोविड-19 मुळे आतापर्यंत 5,33,317 लोकांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif