Ram Mandir Ayodhya: पुजाऱ्यांना ड्रेसकोड ते मंदिर गाभर्यात मोबाईल बंदी; राम मंदिरात नवे बदल

त्या अंतर्गंत आता पुजाऱ्यांनाही ड्रेसकोड असणार आहे.

Ayodhya Ram Mandir (File Photo)

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराबाबत अनेक बदल करण्यात आले आहेत. 1 जुलैपासून मंदिरात नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मंदिरातील पुजाऱ्यांवरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मोबाईल बंदी शिवाय रामलल्लाच्या पुजाऱ्यांसाठी खास ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. हा ड्रेसकोड असेल तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहेत. पुजाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. रामलल्लाच्या पूजाअर्चेसाठी 26 पुजारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सेवा देणार आहेत.(हेही वाचा:Surya Tilak Ayodhya Ram Mandir 2024: राम नवमी दिवशी रामलल्लांच्या मूर्तीवर सूर्य किरणांचा अभिषेक; पहा हा खास क्षण (Watch Video))

धार्मिक समितीने 21 नवीन प्रशिक्षित पुजाऱ्यांना पूजन पद्धतीत सामिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ट्रस्टने पुजाऱ्यांसाठी ओळखपत्रदेखील जारी केले आहे. लवकरच 6 महिन्यांपर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्राबरोबरच नियुक्ती पत्रदेखील या पुजाऱ्यांना सोपवण्यात येणार आहे. फक्त कीपॅड असलेला फोन मंदिरात आणता येणार आहे. पुजाऱ्यांसाठी एक विशेष ड्रेस कोडदेखील देण्यात येणार आहे. यात सदरा (चौबंदी), धोतर आणि पगडी असणार आहे. दररोज सकाळी रामलल्लाची मंगला आरती, श्रृगांर आरती आणि शयन आरती ते रामरक्षा स्त्रोत्र आणि पुरुस्त्रोत्रच्या 16 मंत्रांचे उच्चारण केले जाते.

आषाढी कृष्ण एकादशीच्या निमित्ताने सोमवारी रामलल्लाला विशेष श्रृंगारसोबतच संपूर्ण मंदिर परिसरात फुलांनी सजवले होते. त्यानंतर रामलल्लाची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारी 56 प्रकारच्या व्यंजनांचा भोग चढवण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif