Kanpur: जगातील प्रत्येक पित्याला आपल्या मुलीचे लग्न अशा घरात करायचे असते जिथे तिला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण काही लोक हुंड्यासाठी घरी आलेल्या सुनेचा आणि मुलगी झाल्यावर अत्याचार करायला लागतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमधूनही समोर आला आहे. येथे मुलीला जन्म दिल्यानंतर आणि हुंड्याला कंटाळून पीडितेने पतीपासून घटस्फोट घेतला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी ढोल वाजवून मुलीला परत माहेरी आणले. यावेळी मुलीने सासरच्या घरी गेल्यावर घातलेली ओढणीही तिच्या सासरच्या घराच्या गेटवर बांधली. उर्वीच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या घराच्या भिंतीवर एक संदेशही लिहिला आहे की, आता तुझ्या घरी सुख परत येणार नाही.
पाहा व्हिडीओ:
घटस्फोटानंतर बाप मुलीला ढोल वाजवत घरी आणतो मिळालेल्या माहितीनुसार, निराला नगरमध्ये राहणारे अनिल सविता यांनी त्यांची एकुलती एक मुलगी उर्वी हिचा विवाह चकेरी विमान नगर येथील आशिष रंजनसोबत 31 जानेवारी 2016 रोजी केला होता. उर्वी आणि तिचा नवरा दोघेही दिल्लीत इंजिनिअर म्हणून काम करतात. सासरचे लोक जास्त हुंड्याची मागणी करत होते, असा आरोप आहे.
दरम्यान, 2019 मध्ये उर्वीने एका मुलीला जन्म दिला. यानंतर पती आणि सासरच्यांनी तिच्यापासून अंतर ठेवले. हळूहळू हे प्रकरण इतके वाढले की 28 फेब्रुवारीला दोघांचा घटस्फोट झाला.
मुलगी सासरच्या घरातून आई-वडिलांच्या घरी गेल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हुंडा घेणाऱ्यांविरोधात यूजर्स प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.