Om Birla Slammed Deepender Hooda: 'सल्ला देऊ नका, बसा...' ओम बिर्ला यांनी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांना फटकारले, पाहा व्हिडिओ

ओम बिर्ला यांनी दीपेंद्र हुड्डा यांना फटकारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे शशी थरूर खासदारपदाची शपथ घेऊन परतत असताना हा प्रकार घडला. शशी थरूर यांनी शपथ घेतल्यानंतर जय संविधानाचा नारा दिला.

Om Birla slams Deepender Hooda (फोटो सौजन्य - X/@NarundarM)

Om Birla Slammed Deepender Hooda: लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे पहिले अधिवेशन (First session of Parliament) सुरू आहे. संसदेच्या पहिल्या सत्राच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज सभापती ओम बिर्ला (Om Birla) हे काँग्रेस खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्यावर संतापले. ओम बिर्ला यांनी दीपेंद्र हुड्डा (Deepender Hooda) यांना फटकारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे शशी थरूर (Shashi Tharoor) खासदारपदाची शपथ घेऊन परतत असताना हा प्रकार घडला. शशी थरूर यांनी शपथ घेतल्यानंतर जय संविधानाचा नारा दिला. शपथ घेतल्यानंतर शशी थरूर हे स्पीकर ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत असताना सभापतींनी त्यांना अडवले. ते संविधानाची शपथ घेत असल्याचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले. ही संविधानाची शपथ आहे. सभापतींच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा उभे राहिले आणि म्हणाले की, 'साहेब तुम्ही यावर आक्षेप घ्यायला नको होता.' (हेही वाचा - President Droupadi Murmu Parliament Speech: 'आणीबाणी हा राज्यघटनेवरील सर्वात मोठा हल्ला होता'; संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती मुर्मू यांचे वक्तव्य)

यावर सभापती ओम बिर्ला यांनी दीपेंद्र हुड्डा यांना फटकारले आणि त्यांना कोणावर आक्षेप आहे आणि कोणावर आक्षेप नाही यावर सल्ला देऊ नका. चला बसा, अशा शब्दांत फटकारले. तथापी, या सर्व प्रकारावर आता काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून यावर आक्षेप व्यक्त केला आहे. प्रियांकाने X वर पोस्ट करत प्रश्नार्थक स्वरात म्हटले आहे की, भारताच्या संसदेत 'जय संविधान' म्हणता येत नाही? सभापतींच्या आक्षेपावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी म्हटलं आहे की, 'सत्ताधारी पक्षाच्या लोकांना संसदेत असंसदीय आणि असंवैधानिक घोषणा देण्यापासून रोखले गेले नाही, परंतु विरोधी खासदाराने 'जय संविधान' म्हटल्यावर आक्षेप घेण्यात आला.' (हेही वाचा - Maharashtra Vidhimandal Pavsali Adhiveshan 2024: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु; सत्ताधारी, विरोधकांमध्ये घमासान)

पहा व्हिडिओ - 

प्रियंका गांधी यांनी पुढे म्हटलं आहे की, निवडणुकीच्या वेळी समोर आलेला संविधानाचा विरोध आता नव्या स्वरुपात उदयास येत आहे. ज्या संविधानाने संसद चालते, ज्या संविधानाने प्रत्येक सदस्य शपथ घेतो, ज्या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला जीवनाची सुरक्षा मिळते, त्याच संविधानाला आता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोध होणार का? असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी केला आहे.

ओम बिर्ला यांची बुधवारी दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते राजस्थानमधील कोटा येथून तीन वेळा खासदार झाले आहेत. दुसरीकडे, दीपंदर हुड्डा हे काँग्रेसचे खासदार आहेत ज्यांनी हरियाणाच्या रोहतकमधून 3.4 लाख मतांनी विजय मिळवला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now