Karnataka Election Result 2023: डीके शिवकुमार की सिद्धरामय्या? कर्नाटकात काँग्रेस कोणाला करणार मुख्यमंत्री? जाणून घ्या
सरकार स्थापन झाल्यास शिवकुमार किंवा सिद्धरामय्या यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. सातवेळा आमदार असलेले डीके शिवकुमार हे कर्नाटकच्या राजकारणातील मोठे नाव आहे. अनेक प्रसंगी त्यांनी काँग्रेसला अडचणीतून बाहेर काढले आहे.
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. निवडणुकीचे चित्र काही वेळात स्पष्ट होईल. भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) आपापल्या विजयाचा दावा केला आहे. सरकार स्थापन झाल्यावर विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाईल, असे भाजपने म्हटले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे कर्नाटकातील काँग्रेसचे मोठे चेहरे आहेत. सरकार स्थापन झाल्यास शिवकुमार किंवा सिद्धरामय्या यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. सातवेळा आमदार असलेले डीके शिवकुमार हे कर्नाटकच्या राजकारणातील मोठे नाव आहे. अनेक प्रसंगी त्यांनी काँग्रेसला अडचणीतून बाहेर काढले आहे. यावेळीही ते कनकापुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. (हेही वाचा -Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकात मोदी-शहांची रणनीती कशी फसली? राज्यातील काँग्रेसच्या दणदणीत विजयाची प्रमुख कारणे काय आहेत? जाणून घ्या)
2013 ते 2018 पर्यंत ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सिद्धरामय्या हे देखील मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसचे सरकार आल्यास सिद्धरामय्या यांच्या नावावरही मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होऊ शकते. वरुण मतदारसंघातून सिद्धरामय्या आपले नशीब आजमावत आहेत.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणे कर्नाटकातही काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासाठी अडचण येऊ शकते. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांचे समर्थक त्यांच्या संबंधित नेत्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहेत. निकालापूर्वी सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र यानेही वडिलांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी मागणी केली आहे. कर्नाटकच्या विकासासाठी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, असे यतींद्रने म्हटलं आहे.