Ram Rahim Parole: डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला पुन्हा 50 दिवसांचा पॅरोल; 29 दिवसांत दुसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर येणार
गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. राम रहीमला 8व्यांदा पॅरोल मिळाला आहे. यापूर्वी तो नोव्हेंबरमध्ये तुरुंगातून बाहेर आला होता.
Ram Rahim Parole: डेरा सच्चा सौदा (Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Ram Rahim) ला पुन्हा एकदा पॅरोल (Parole) मिळाला आहे. यावेळी हरियाणा सरकारने राम रहीमला 50 दिवसांचा पॅरोल दिला आहे. गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. राम रहीमला 8व्यांदा पॅरोल मिळाला आहे. यापूर्वी तो नोव्हेंबरमध्ये तुरुंगातून बाहेर आला होता. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (SGPC) गुरमीत राम रहीमला वारंवार पॅरोल मंजूर केल्याबद्दल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राम रहीमला दोन वेगवेगळ्या खून खटल्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते, ज्यासाठी त्याला 17 जानेवारी 2019 आणि 18 ऑक्टोबर 2021 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. (हेही वाचा -Gurmeet Ram Rahim Sues Journalist: गुरमीत राम रहीम यांनी पत्रकार आणि YouTuber श्याम मीरा सिंहविरोधात दाखल केला मानहानीचा दावा)
काय आहे नेमक प्रकरण?
सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीमला या प्रकरणात दोषी ठरवले होते. याशिवाय डेरा माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमलाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (हेही वाचा - Ram Rahim Cuts Cake with Sword: राम रहीमने तलवारीने कापला केक; साजरा केला पॅरोल मिळाल्याचा आनंद (Watch Video))
पॅरोल म्हणजे काय?
शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी दोषी काही दिवसांसाठी पॅरोलद्वारे तुरुंगातून मुक्त होतो. ज्यासाठी चांगले वर्तन ही अट आहे. यासाठी कैद्याला कारागृहातून बाहेर येण्यासाठी आवश्यक ती कारणे द्यावी लागतात. त्याला पॅरोल देण्याचा अंतिम निर्णय संबंधित राज्याचे सरकार घेते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)