Delhi Weather Update: दाट धुक्यामुळे दिल्लीमधून अनेक उड्डाणे, ट्रेन्स रद्द (पाहा व्हिडिओ)
गेल्या काही दिवसांपासून धुक्याच्या दाट थरामुळे दृश्यमानताृ कमी झाल्यामुळे हवाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
17 जानेवारी रोजी दिल्लीतील दाट धुक्यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) येणा-या अनेक उड्डाणे उशिराने आणि काही रद्द करण्यात आली. दाट धुक्यामुळे अनेक गाड्यांना उशीर झाला तर काही रद्द करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून धुक्याच्या दाट थरामुळे दृश्यमानता (poor visibility) कमी झाल्यामुळे हवाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्याही 15 तासांहून अधिक उशिराने धावत आहेत. पालम विमानतळावर सकाळी 7 वाजता 100 मीटर दृश्यमानता नोंदवली गेली, तर सकाळी 7:30 वाजता दृष्यमानता 0 मीटरवर घसरली होती. (हेही वाचा - IMD Weather Alert: देशात पुढील पाच दिवस तापमान आणखी घटन्याची शक्यता- हवामान विभाग)
पाहा व्हिडिओ -
देशाच्या अनेक भागांमध्ये धुक्यामुळे अनेक उड्डाणे उशीराने आणि काही रद्द झाल्यामुळे प्रवासी त्यांच्या नियोजित उड्डाणांच्या हालचालीची वाट पाहत आहेत.
दरम्यान कमी दृष्यमानतेमुळे दिल्लीवरुन धावणाऱ्या अनेक ट्रेन देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
पाहा पोस्ट -