Delhi Crime: दिल्लीत मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद, तरुणाची चाकून भोसकून हत्या, तिघांना अटक

एका तरुणीशी बोलल्याच्या वादावरून 20 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्लीतील मोठी खळबळ उडाली आहे.

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi Crime: एका तरुणीशी बोलल्याच्या वादावरून 20 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्लीतील मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केले आहे. अरमान खान (18), फैसल खान (21), समीर उर्फ बाळू (19) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे. आरोपी हे  दिल्लीतील  गोकलपूरीचे रहिवासी आहेत. अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (हेही वाचा- कोल्हापूरात शाररिक संबंधास नकार दिल्याने संतापून विधवा महिलेचा खून)

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुलपुरी पोलिस ठाण्यात लखन चौकाजवळ एका व्यक्तीचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिस नियत्रंण कक्षाला फोन आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतला. ही घटना बुधवारी रात्री 9 वाजता घडली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला. पोलिसांना मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला चाकून सापडला.माहिर उर्फ इम्रान असे मृताचे नाव असून तो गाझियाबादमधील लोणी येथील रहिवासी होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची तपासणी केल्यावर दोन तरुणींची नावे समोर आली आहे. दोघेही माहिरच्या मैत्रिणी आहे. एके दिवशी माहिर तिच्या मैत्रिणीच्या घरी गेला तेव्हा त्याची मैत्रीण अरमानशी बोलत असल्याने माहिराला खटकले. त्यानंकर माहिरने अरमान सोबत नको बोलू असं सांगितले. ही गोष्ट अरमानला समजल्यावर अरमानने तिच्या मैत्रिणीचा फोन घेतला असं राहून माहिरला एका ठिकाणी बोलवून तिघांनी भोसकून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालायत पाठवला.या घटनेची माहिती माहिरच्या कुटुंबियांना देण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement