IPL Auction 2025 Live

Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस न घेतल्यामुळे 'या' राज्याने दोन औद्योगिक युनिट्स केले बंद

तसे न केल्यास या औद्योगिक युनिट्सना काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

Vaccine | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दमणच्या (Daman) केंद्रशासित प्रदेशात सर्व कर्मचार्‍यांसाठी अँटी-कोरोना व्हायरस लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस अनिवार्य केले आहेत. या अधिकृत आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दोन औद्योगिक युनिट्स (Industrial units) बंद करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. औद्योगिक युनिट्सच्या व्यवस्थापनाला त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांनी लसीचे दोन्ही डोस अनिवार्यपणे घ्यावेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास या औद्योगिक युनिट्सना काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. हेही वाचा Omicron Variant: चंदीगड आणि आंध्र प्रदेशसह कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळले, रुग्णसंख्या 36 वर

प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासणी दरम्यान, असे आढळून आले की दमण जिल्ह्यातील दाभेळ (Dabhel) येथे दोन युनिट कार्यरत आहेत. तर त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. व्यवस्थापनाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना अँटी-कोविड 19 लसीचे दोन्ही डोस मिळतील याची खात्री करेपर्यंत या दोन्ही युनिटमधील उत्पादन शनिवारपासून बंद करण्यात आले आहे.

कामगारांच्या लसीकरणाशी संबंधित डेटाच्या पडताळणीसाठी परिसरातील विविध औद्योगिक युनिट्सची तपासणी सुरू राहील. दमण जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत रीलिझमध्ये म्हटले आहे की व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जारी केलेल्या कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या युनिट्सवर त्वरित कारवाई केली जाईल.