Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळात ‘ओएनजीसी’चे P305 जहाज बुडाले; 146 जणांना वाचविण्यात यश

ओएनजीसीचे हे पी 305 जहाज अरबी समुद्रात असलेल्या ‘बॉम्बे हाय’ येथील तेल उत्खनन परिसरात होते.

ONGC's P305 | (Photo Credits: ANI)

अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पठ्ठ्यामुळे आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला जोरदार फटका बसला. महाराष्ट्रात कोकण आणि मुंबई, ठाणे, रायगड परिसरात किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले. दरम्यान, या वादळाचा फटका 'ओएनजीसी' (ONGC) कंपनीलाही बसला. या कंपनीचे Barge P305 हे समुद्राद असलेले जहाज तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) भरकटले. भरकटलेल्या जहाजाचा शोध सुरु असताना हे जहाज मंगळवारी (18 मे 2021) सकाळी बुडाले. दरम्यान, हे जहाज बुडत असताना जहाजावरील 276 पैसी 146 जणांचा बचाव करण्यास नौदलाला यश आले आहे. जहाजावर असलेले उर्वरीत 130 जण अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय नौदलाकडून त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, खराब वातावरण आणि तौक्ते वादळामुळे समुद्रात (Rough Sea) उसळलेल्या उंचच उंच लाटा यांमुळे जहाज भरकटले. ओएनजीसीचे हे पी 305 जहाज अरबी समुद्रात असलेल्या ‘बॉम्बे हाय’ येथील तेल उत्खनन परिसरात होते. याच परिसरात हिरा ऑईल क्षेत्रही आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) कोकण किनारपट्टीवरुन पुढे मुंबईच्या दिशेने सरकले. याच वेळी हे जहाज अपघातग्रस्त झालं. उभ्या असलेल्या या जहाजाचा नांगर चक्रीवादळाच्या लाटांपूडे टीकाव धरु शकला नाही. परिणामी हे जहाज भरकटू लागले. भरकटलेल्या या जहाजावरुन नौदलाला एक एसओपी (SOP) पाठविण्यात आला. जहाज जेव्हा अपत्कालीन स्थितीत, संकटात किंवा बुडत असते तेव्हा जहाजावरुन एक संदेश पाठवला जातो. त्या संदेशास एसओपी (SOP) असे संबोधतात. (हेही वाचा, Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील 'बार्ज पी-305' जहाजात अडकलेल्या 146 जणांची सुटका; 130 जण बेपत्ता)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

भारतीय नौदलाला एसओपी मिळताच या जहाजाच्या मदतीसाठी INS कोच्ची आणि INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठविण्यात आल्या. परंतू, जहाजाला वाचविण्यात यश आले नाही. दरम्यान, याशिवाय भारतीय नौदलाचे जहाज सम्राटही परिसरात उभे असल्याचे समजते. ओएनजीसीच्या Barge P305 जहाजावरुन बेपत्ता झालेल्या 130 जणांचा शोध अद्यापही सुरु आहे.