Cyclone Remal Update: तेलंगणात 'रेमाल' चक्रीवादळाचा प्रभाव, मुसळधार पाऊस आणि वादळात 13 जणांचा मृत्यू

या जोरदार वादळामुळे नागरकुर्नूल, मेडक, रंगारेड्डी, मेडचल मलकाजगिरी आणि नलगोंडा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगरकुरनूल जिल्ह्यातील तंदूर गावात बांधकामाधीन पोल्ट्री शेड कोसळून वडील आणि मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला.

Cyclone प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

Cyclone Remal Update: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'रेमाल' या तीव्र चक्रीवादळाचा (Cyclone Remal) परिणाम तेलंगणातही (Telangana) दिसून आला आहे. रविवारी रात्री राज्याची राजधानी हैदराबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कहर केला. तेलंगणात वादळ आणि पावसामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, वीज आणि संपर्क टॉवरचे नुकसान झाले. तसेच वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला. एकट्या नगरकुर्नूल जिल्ह्यात 7 मृत्यू झाले आहेत. हैदराबादच्या वेगवेगळ्या भागांतून चार आणि मेडकमधून दोन जणांचा मृत्यू झाला.

बांधकामाधीन पोल्ट्री शेड कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू -

या जोरदार वादळामुळे नागरकुर्नूल, मेडक, रंगारेड्डी, मेडचल मलकाजगिरी आणि नलगोंडा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगरकुरनूल जिल्ह्यातील तंदूर गावात बांधकामाधीन पोल्ट्री शेड कोसळून वडील आणि मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला. मल्लेश (38), त्यांची मुलगी अनुषा (12), मजूर चेन्नम्मा (38) आणि रामुडू (36) अशी मृतांची नावे आहेत. तर या घटनेत चार जण जखमी झाले. याच जिल्ह्यात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. (हेही वाचा -Cyclone Remal Video: विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली, अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती, रेमाल चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस)

याशिवाय, हैदराबादच्या बाहेरील शमीरपेठमध्ये मोटारसायकलवरून जात असलेल्या दोन लोकांवर झाड पडले. यामुळे, दोघांचा मृत्यू झाला. धनंजय (44) आणि नागिरेड्डी रामी रेड्डी (56) अशी मृतांची नावे आहेत. हैदराबादच्या हाफिजपेट भागात जोरदार वादळामुळे शेजारच्या घराच्या छतावरून विटा पडल्याने मोहम्मद रशीद (45) आणि मोहम्मद समद (3) यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Cyclone Remal Video: बिजली के खंभे-पेड़ उखड़े, भारी बारिश के बाद बाढ़ जैसै हालात, चक्रवाती तूफान रेमल ने मचाई तबाही

महबूबनगर, जोगुलांबा-गडवाल, वानापर्थी, यादद्री-भोंगीर, संगारेड्डी आणि विकाराबाद जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन लाईन तुटल्या. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्या. खांबांचे नुकसान होऊन ते उन्मळून पडले होते. काही ठिकाणी होर्डिंग्ज आणि मोबाईल टॉवर रस्त्यावर आणि घरांवर पडले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now