Monsoon Forecast: भारतात धडकणार 'बिपरजॉय' चक्रीवादळ; येत्या 24 तासांत 'या' राज्यांमध्ये बदलणार हवामान, IMD कडून अलर्ट जारी
'बिपरजॉय' वादळामुळे हवामानात बदल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
Monsoon Forecast: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी इशारा दिला की आग्नेय अरबी समुद्रावरील खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या वादळाला बिपरजॉय (Cyclone Biperjoy) असे नाव देण्यात आले आहे. IMD ने आज यासंदर्भात इशारा दिला आहे. IMD ने सांगितले की, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील खोल दाबाच्या क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडेल. 'बिपरजॉय' वादळामुळे हवामानात बदल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
या राज्यांमध्ये अलर्ट जारी -
केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव परिसरात 6 जून आणि कोकण-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर 8 ते 10 जूनपर्यंत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्रात उतरलेल्या मच्छिमारांना किना-यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि त्याचा खोलीकरण केरळ किनारपट्टीच्या दिशेने मान्सूनच्या आगमनावर परिणाम होऊ शकतो, असे आयएमडीने सोमवारी सांगितले होते. मात्र, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख हवामान विभागाने दिलेली नाही. (हेही वाचा - Monsoon Update: महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? उकाड्यामुळे नागरिक हैराण; काय आहे हवामान तज्ज्ञांचा अंदाज; घ्या जाणून)
खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरने म्हटले आहे की, केरळमध्ये 8 किंवा 9 जून रोजी मान्सून दाखल होईल, परंतु या काळात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने म्हटले आहे की अरबी समुद्रातील या शक्तिशाली हवामान प्रणालींचा अंतर्गत भागात मान्सूनच्या आगमनावर प्रभाव पडतो. त्याच्या प्रभावाखाली मान्सून किनारी भागात पोहोचू शकतो. परंतु पश्चिम घाटाच्या पलीकडे जाण्यास वेळ लागेल.