Online Fraud: निनावी कॉल्सवर PF अकाऊंट्स सह वैयक्तिक माहिती देणं टाळा; होऊ शकते मोठी फसवणूक

मात्र अशा निनावी कॉल्सवर कोणताही नंबर, ओटीपी नंबर शेअर करू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

Cyber Attacks (Image: PTI/Representational)

कोरोना संकटकाळामुळे (Coronavirus Lockdown)  जगामध्ये लोकांचा एकमेकांशी थेट संपर्क कमी झाला आहे. याच परिस्थितीचा फायदा उठवत अनेक ठिकाणी सायबर हल्ले, ऑनलाईन फसवणूक करून पैशांवर डल्ले मारण्याची प्रकरणं वाढली आहेत. दरम्यान आता पीएफ अकाऊंट (PF Account Number) आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करण्याचा बहाणा देत काही फोन कॉल येत असल्याचे प्रकार उघड होत आहेत. मात्र अशा निनावी कॉल्सवर कोणताही नंबर, ओटीपी नंबर शेअर करू नका असे आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: EPFO WhatsApp Helpline Service: आता व्हॉट्सअ‍ॅप वर थेट मिळणार पीफ धारकांना मदत; इथे पहा वांद्रे, ठाणे, पुणे सह देशभरातील रिजनल ऑफिसचा हेल्पलाईन नंबर.

सायबर हल्लेखोर लोकांना फोन करून काही बहाणे देत त्यांची वैयक्तिक माहिती घेत आहे. पण अनावधानाने जरी तुम्ही काही महत्त्वाची माहिती दिल्यास त्याचा परिणाम म्हणून तुमच्या खात्यातील सारे पैसे वळते केले जाऊ शकतात. तर पीएफ अकाऊंटमध्येही नंबर बदलणं, पासवर्ड बदलणं असे प्रकार केले जाऊ शकतात त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर अशा कोणत्याही फसव्या, निनावी फोन कॉल्सला दाद देऊ नका. असे आवाहन करण्यात आले आहे.

EPFO ने कोविड 19 जागतिक संकटाचा धोका पाहता पीएफ अकाऊंट धारकांसाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस (WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. देशातील सार्‍या 138 कार्यालयांसाठी ही व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन आता एका क्लिक वर होणं शक्य झाले आहे.