Kerala Shocker: आपल्या मुलाच्या अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्रासलेल्या, पथनामथिट्टा येथील एका वृद्ध जोडप्याने शुक्रवारी आपल्या कारमध्ये आग लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुवल्ला येथील रहिवासी राजू थॉमस जॉर्ज (६९) आणि लेगी थॉमस (६३) यांचे मृतदेह त्यांच्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या राहत्या घरातून मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, या जोडप्याने हे पाऊल उचलल्याचे दिसते कारण ते त्यांच्या 39 वर्षीय मुलाच्या व्यसनाधीनतेमुळे नाराज होते. त्यांचा मुलगा सध्या इडुक्की जिल्ह्यातील थोडुपुझा येथील खाजगी पुनर्वसन केंद्रात दाखल आहे. हे देखील वाचा: Noida: घरात घुसून भजे बनवतात पेटपूजा करतात मग करतात लाखोंचा माल लंपास, अनोख्या चोरीमुळे पोलीसही हैराण
एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “ही सुसाईड नोट पोलिसांसाठी होती. जोडप्याने आपल्या मुलाला सरकारी संस्थेत उपचारासाठी दाखल करण्याची विनंती केली आहे. आपली संपत्ती आपल्या सून आणि नातवाच्या ताब्यात द्यावी, असेही ते म्हणाले.