Coronaphobia: पती शारिरीक सुख देण्यास असमर्थ? पत्नीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सत्य आले समोर
तिचा पती तिला संतती सुख देण्यास असमर्थ आहे, असेही तिने तक्रारीत म्हंटले आहेत. ही घटना भोपाळमध्ये घडली आहे.
लग्न झाल्यानंतर आपला पती त्याच्या जवळ येऊ देत नाही, यामुळे एका महिलेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे. तिचा पती तिला संतती सुख देण्यास असमर्थ आहे, असेही तिने तक्रारीत म्हंटले आहेत. ही घटना भोपाळमध्ये घडली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पाळण करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवत असल्याचे पतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिलेल्या उत्तरात म्हंटले आहे. दरम्यान, पतीला पुरुषत्व सिद्ध करणाऱ्या काही वैद्यकीय चाचण्या करुन त्याचे अहवाल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागले. हे अहवाल पाहिल्यानंतरच या महिलेने पतीसोबत सासरी जाण्यास होकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपला पती आपल्याला शारिरीक सुख देण्यास असमर्थ आहे, असे सांगत भोपाळमधील एका महिलेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच तिच्या सासरचे लोकही तिला त्रास देत आहेत. यामुळे माझ्या पतीने मला महिन्याचा खर्च द्यावा, अशी मागणी या संबधित महिलेने केली होती. तिचा पती फोनवर गोड बोलतो, पण तो तिला त्याच्या जवळ येऊच देत नाही. यासंदर्भात तिने तिच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितले. त्यांनी पतीशी यासंदर्भात चर्चा केली. मात्र काहाही घडले नाही, असे या महिलेने तक्रारीत म्हटले होते. हे देखील वाचा- COVID19: मास्क न घालणे हा अन्य नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन- सुप्रीम कोर्टाने बदलला गुजरात हायकोर्टाचा निर्णय
पत्नीच्या घरचे सर्वजण पॉझिटिव्ह आल्याने पत्नीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या व्यक्तीला वाटत होते. त्यामुळेच आपल्याला पत्नीच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून तो तिला जवळ येऊ देत नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सुरक्षित अंतर ठेवत होता, असे महिलेच्या पतीने प्राधिकरणाला दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे.
समोपदेशनादरम्यान पतीला करोना फोबिया म्हणजेच करोनाचा प्रचंड भीती होती, असे निर्दर्शनास आले. पत्नीने त्याच्यावर केलेले आरोप खोटे ठरले. आरोग्य चाचण्यांमध्ये तो ठणठणीत असल्याचे स्पष्ट झालं. समोपदेशनानंतर दोघांमधील गैरसमज दूर झाले आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप शर्मा यांनी दिली आहे.