Coronavirus: केंद्र सरकार खरेदी केलेली Corona Vaccines राज्यांना मोफत देणार, लस आणि ऑक्सिजन उपकरणांवरील सीमा शुल्कही माफ
तसेच, खरेदी केलेले डोस राज्यांना मोफत पुरवठा करेन. यासोबतच लस आणि ऑक्सिजन उपकरणांवरील सीमा शुल्कही माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पुणे येथील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ने कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यापूर्वी आपल्या कोविशिल्ड (Covishield) लसीबाबत एक दरपत्रक प्रसिद्ध केले. या दरपत्रकानंतर देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील अनेक राज्य सरकारं आणि संस्थांनी कोरोना लसीसाठी केंद्र सरकार किती खर्च करणार यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, केंद्र सरकार 150 रुपये प्रती डोस दराने कोविशिल्ड लस खरेदी करेन. तसेच, खरेदी केलेले डोस राज्यांना मोफत पुरवठा करेन. यासोबतच लस आणि ऑक्सिजन उपकरणांवरील सीमा शुल्कही माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (24 एप्रिल) एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोविड लस (Corona Vaccines) आणि 16 प्रकारची ऑक्सिजन उपकरणं यांच्या आयातीवर बेसिक ड्यूटी पुढचे तीन महिने माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने जारी केलेल्या दरपत्रकानुसार राज्य सरकारांना कोविशिल्ड (Covishield) लस प्रती डोस 400 रुपये दराने मिळणार आहे. खासगी रुग्णालयांना ही लस 600 रुपये प्रती डोस दराने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांच्या तुलनेत केंद्र सरकारला मात्र ही लस अवघ्या 150 रुपयांत मिळणार आहे. या दरपत्रकावरुन सर्वच स्तरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी एक बैठक घेतली. त्यानंतर दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले की, 150 रुपये प्रति डोस दराने केंद्र सरकार कोरोना लस खरेदी करेन आणि ते सर्व डोस राज्यांना मोफत परवठा करेन. (हेही वाचा, Coronavirus: सरकारी दवाखन्यांसाठी Covishield लस 400 रुपयांना खासगी रुग्णालयांना 600 रुपयांत; Serum Institute कडून दरपत्रक जारी)
देशात कोरोना लसीकरणाचा विस्तार केला जात आहे. केंद्र सरकारने कोरना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत आपली रणनिती जाहीर केली आहे. कोरना लस निर्माते खुल्या बाजारातही कोरोना लस विक्री करु शकतात. तसेच, राज्य सरकार आणि खासी खासगी रुग्णालयेही कोरोना लस निर्मात्यांकडून खरेदी करु शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रायाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, कोरोना लस केंद्र सरकार प्रती डोस 150 रुपये दराने खरेदी करेन. भारत सरकारकडून खरेदी केलेल्या कोरोना लसीचे डोस हे राज्यांना मोफत पुरवले जातील.