Congress Bharat Jodo Yatra: केरळमध्ये 'भारत जोडो यात्रे'साठी देणगी देण्यास नकार दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजी विक्रेत्याला केली मारहाण, Watch Video

अनसने 2000 रुपये देण्यास नकार दिला. तो म्हणाला की, तो फक्त 500 रुपये देऊ शकतो. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुकानाची तोडफोड सुरू केली.

Congress workers beat vegetable seller (PC - ANI)

Congress Bharat Jodo Yatra: केरळमध्ये (Kerala) 'भारत जोडो यात्रे'साठी (Bharat Jodo Yatra)देणगी देण्यास नकार दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress workers) भाजी विक्रेत्याला मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण कोल्लम जिल्ह्यातील कुन्नीकोड ​​येथील आहे. वृत्तानुसार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनास यांच्या कुन्नीकोड ​​(Kunnikode) येथील भाजीच्या दुकानाची तोडफोड केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. 'भारत जोडो यात्रे'साठी देणगी म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याच्याकडून जबरदस्तीने 2 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते चिडले. त्यानंतर त्यांनी भाजीवाल्याच्या दुकानाची तोडफोड करून त्यांना बेदम मारहाण केली.

ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनस यांची 2000 रुपयांची पावती फाडली आणि 'भारत जोडो यात्रे'साठी जबरदस्तीने देणगी मागितली. अनसने 2000 रुपये देण्यास नकार दिला. तो म्हणाला की, तो फक्त 500 रुपये देऊ शकतो. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या दुकानाची तोडफोड सुरू केली. (हेही वाचा - Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये तब्बल 15 किमी खिडकीला लटकून राहिला चोर; मोबाईल चोरणे आले अंगाशी (Watch))

वृत्तानुसार, दुकानदार अनस यांनी या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याच वेळी, विलक्कुडी पश्चिम मंडल समितीचे अध्यक्ष म्हणाले की, काँग्रेसकडून कोणताही हिंसाचार झालेला नाही. काँग्रेसला बदनाम करण्याचा हा कम्युनिस्ट पक्षाचा डाव आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने 3 कार्यकर्त्यांना निलंबित केल्याची बातमी समोर आली आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये युवक काँग्रेसचे सचिव एच अनिश खानही होते.

दरम्यान, 7 सप्टेंबर 2022 पासून राहुल गांधी यांनी काँग्रेस सदस्य आणि इतर कार्यकर्त्यांसोबत आपली 'भारत जोडो यात्रा' सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास 150 दिवसांनी काश्मीरमध्ये संपेल अशी अपेक्षा आहे. सुमारे 3500 किमीचा हा प्रवास 12 राज्यांमधून जाणार आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान कोणताही वाद होऊ नये, असा पक्षाचा दावा असला तरी सुरुवातीपासूनचं ही यात्रा अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif