Cold Wave Alert: थंडीचा कडाका वाढला, भारतातील अनेक भागात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

थंडीच्या लाटेमुळे कडाका वाढला असून तापमानात सातत्याने घट होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत या भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Weather | (Photo Credit- X)

Cold Wave Alert: उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम आहे. थंडीच्या लाटेमुळे कडाका वाढला असून तापमानात सातत्याने घट होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडीबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत या भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. IMD नुसार, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये पुढील सहा दिवस आणि हिमाचल प्रदेशमध्ये 20 डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी असेल. मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातही थंडीचा प्रभाव जाणवेल.

 IMD हवामान अंदाज 
हवामान खात्याने सांगितले की, 16 ते 22 डिसेंबर दरम्यान राजस्थानच्या पश्चिम आणि पूर्व भागात थंडीची लाट कायम राहील. हिमाचल प्रदेशात 20 डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी कायम राहणार आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये 20 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट राहणार आहे.

दाट धुक्याची चेतावणी

रात्री उशिरा आणि पहाटे दाट धुके पडण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश: 18 डिसेंबरपर्यंत दाट धुके राहील. ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात 19 डिसेंबरपर्यंत दाट धुके राहील.

मुंबईत हवामान कसे असेल?

मुंबई हे शहर  दमट हवामानासाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र या डिसेंबरमध्ये अचानक शहराच्या तापमानात असामान्य घट दिसून येत आहे. साधारणपणे मुंबईचा हिवाळा अगदी सामान्य असतो, मग हवामानात हा बदल होण्याचे कारण काय असू शकते? 9 डिसेंबर रोजी मुंबईत डिसेंबर महिन्यातील 10 वर्षांतील सर्वात थंड दिवस होता. या दिवशी शहराचे तापमान 13.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. यानंतर 16 डिसेंबरला म्हणजेच आजही तापमानात घट होऊन ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले.