मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अलायन्स एअर कंपनीच्या 9I633 विमानाचे अमरावती विमानतळावर स्वागत झाले. हे पहिलं प्रवासी विमान असल्याने त्याला शानदार वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. आता विदर्भासह वर्‍हाड भागात जाण्यासाठी देखील विमानसेवा सुरू झाली असल्याने अमरावतीच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. नक्की वाचा: Amravati Airport Inauguration: अमरावती विमानतळाचं लोकार्पण संपन्न; पहा मुंबई-अमरावती- मुंबई उड्डाणाच्या वेळा काय? 

अमरावती विमानतळावरील  शानदार वॉटर कॅनन सलामी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)