Gas Leak in Government College Lab: हैदराबादमधील कस्तुरबा कॉलेजच्या प्रयोगशाळेत रासायनिक वायू गळती; 25 विद्यार्थी बेशुद्ध

विद्यार्थ्यांनी श्वासोच्छवासाचा त्रास आणि चक्कर आल्याची तक्रार केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

Gas Leak in Kasturba College at Hyderabad (PC - ANI)

Gas Leak in Government College Lab: तेलंगणातील हैदराबाद (Hyderabad) येथील कस्तुरबा शासकीय महाविद्यालयाच्या (Kasturba College) प्रयोगशाळेत गॅस गळती (Gas Leak) झाल्याची घटना समोर आली आहे. या रसायन गळतीमुळे 25 विद्यार्थी बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत. सध्या फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून गॅस गळतीचे कारण शोधले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी श्वासोच्छवासाचा त्रास आणि चक्कर आल्याची तक्रार केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. गॅस गळतीचे वृत्त पसरताच काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालय गाठले आणि महाविद्यालय प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलन सुरू केले. (हेही वाचा - Bangladesh Shocker! बांगलादेशात हिंदू मुलीची श्रद्धाप्रमाणे हत्या; आरोपीने मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकले)

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. कोणत्या गॅसची गळती झाली हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कस्तुरबा सरकारी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कथित रासायनिक वायू गळतीनंतर गॅसच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.