Char Dham Yatra Halted: चार धाम यात्रा स्थगित, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा रेड अलर्ट
गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
Char Dham Yatra Halted: उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता चारधाम यात्रा रविवारी स्थगित करण्यात आली आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान खात्याने(Meteorological Department)उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांना 7 ते 8 जुलै रोजी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीच्या रेड अलर्ट(Red Alert)जारी करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील 20 हून अधिक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, रेड अलर्ट असून ऋषिकेशच्या पलीकडे चारधामचा प्रवास सध्या थांबवण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता, सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्तीजन्य परिस्थिती पाहता उत्तराखंड आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्गाचे अनेक रस्ते अनेक ठिकाणी बंद करावे लागले आहेत. तोटा खोऱ्याजवळ दरड कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.