Chandrayaan 3: चंद्रायान चंद्रापासून केवळ २५ किमी दूर, अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पार
इस्रोने सोशल मीडियावर माहिती दिली.
Chandrayaan 3: भारताची मोहिम चाद्रंयान 3 अंत्यत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-3 चे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी पहाटे सांगितले. रविवारी रात्री उशिरा चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या सर्वात जवळ पोहोचले. आता विक्रम लॅंडर चंद्रा पासून 25 किमो दूर आहे. यानंतर, मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे
"दुसर्या आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशनने LM कक्षा 25 किमी x 134 किमी पर्यंत यशस्वीरित्या कमी केली आहे. मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त लँडिंग साइटवर सूर्योदयाची प्रतीक्षा केली जाईल. 23 ऑगस्ट 2023 रोजी पॉवर डाउन सुरू होण्याची अपेक्षा आहे. असं " इस्रोने ट्विटर वर सांगितले. विक्रम लँडर सूर्यप्रकाश आणि शक्ती वापरून आपले ध्येय पुढे नेणार आहे. दोन्ही रोव्हर वीज निर्मितीसाठी सौर पॅनेल वापरतील.
पुढचे काही तास हे महत्त्वाचे असणार आहे. लॅंडरच्या बाहेर सेन्सर आणि कॅमेरा बसवण्यात आला आहे. ज्यात योग्य जागा शोधण्यासाठी मदत होईल. ते हळूहळू चद्रांवर लॅंड करेन. चांद्रयान-3 मोहिमेच्या लँडरचे नाव विक्रम साराभाई (1919-1971) यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.