Jharkhand Train Derails: अपघातस्थळावरून प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची व्यवस्था; बसेसही उपलब्ध (Watch Video)
त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर आता रेल्वेने अपघातस्थळावरून प्रवाशांना नेण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे.
Jharkhand Train Derails: झारखंडच्या सरायकेला - खरसावन जिल्ह्यात मंगळवारी पहाटे सीएसएमटी - हावडा मेलचे(Howrah-CSMT Express) 18 डब्बे रुळावरून घसरले(Jharkhand Train Derailed) आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपघातामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. पहाटेपासून प्रवासी एकाच जागी अडकल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर आता रेल्वेने अपघातस्थळावरून प्रवाशांना नेण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था (Special Train)केली आहे. त्याशिवाय, बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. (हेही वाचा:Jharkhand Train Derailment: हावडा- सीएसएमटी रेल्वे रुळावरून घसरली, 6 प्रवासी जखमी (See Photo) )
व्हिडीओ पहा
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. हावडा येथून मुंबईच्या दिशेने ही एक्स्प्रेस येत होती. मंगळवारी पहाटे ट्रेन झारखंडच्या टाटानगर परिसरात आली. त्याचवेळी अचानक एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले. या घटनेत सहा प्रवासी जखमी झालयाची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभांगातर्गत जमेशदूरपासून 80 किमी अंतरावर बारांबूजवळ पहाटे 3.45 वाजता हा अपघात झाला. (हेही वाचा: Howara-CSMT Express Derailed near Chakradharpur: झारखंड मध्ये हावड़ा-सीएसएमटी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर नागपूर, सेवाग्राम, वर्धा, बसवळ, बडनेरा, शेगाव स्टेशनसाठी हेल्पलाईन नंबर जारी)
पोस्ट पहा
अपघात इतका भीषण होता, ट्रेनचे डबे जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. या अपघातात 6 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे.