CDS Bipin Rawat Funeral: अलविदा जनरल! CDS बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मुलींनी दिला मुखाग्नी
याशिवाय नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली.
तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (Chief of Defense Staff General Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. दोन्ही मुलींनी वडील जनरल बिपिन रावत आणि आई मधुलिका यांच्यावर अंत्यसंस्कार केले. कृतिका आणि तारिणी या त्यांच्या मुलींनी त्यांना मुखाग्नी दिली. यावेळी त्यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी देशातील दिग्गज राजकीय नेत्यांसह भारतीय संरक्षण दलातील 800 वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंकाचे सैन्य दल प्रमुखांनी उपस्थिती लावली.
Tweet
17 तोफांची सलामी देण्यात आली
सीडीएस जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या दोन मुली (कृतिका आणि तारिणी) यांनी त्यांच्या पालकांना श्रद्धांजली वाहिली. त्याला अंतिम निरोप देण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यही सामील झाले. जनरल बिपिन रावत यांना अंत्यसंस्काराच्या वेळी 17 तोफांची सलामी देण्यात आली. तसेच सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा, तिन्ही सेवांचे प्रमुख, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. (हे ही वाचा Who Will Be Next CDS: बिपिन रावत यांच्या निधनानंतर देशातील आगामी CDS कोण होणार? शर्यतीत ही दोन नावे पुढे.)
Tweet
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली
तत्पूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, DRDO प्रमुख डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवांना श्रद्धांजली वाहिली.
Tweet
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर जमले होते. याशिवाय सर्वत्र सीडीएस बिपिन रावत यांचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. '‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपिन जी का नाम रहेगा’ अशा घोषणा लोकांनी दिल्या.