Delhi Excise Policy Scam: मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ, देश सोडण्यावर बंदी; CBI ने जारी केली लुकआउट नोटीस
मात्र, यामध्ये मुंबईस्थित एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांच्या नावाचा समावेश नाही.
Delhi Excise Policy Scam: दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आउट परिपत्रक (Lookout Notice) जारी केलं आहे. सीबीआयने ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे अशा आरोपींची नावे या परिपत्रकात आहेत. मात्र, यामध्ये मुंबईस्थित एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर यांच्या नावाचा समावेश नाही.
सीबीआयने परिपत्रक जारी केल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले की, हे मान्य करा की हळू हळू ऋतूही बदलत राहतात. वाऱ्यालाही तुमचा वेग पाहून आश्चर्य वाटते सर. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, तुमचे सर्व छापे फसले आहेत. काहीही सापडले नाही. आता तुम्ही लूक आऊट नोटीस जारी केली आहे की, मनीष सिसोदिया उपलब्ध नाहीत. हे काय नाटक आहे? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ? (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणूक 'आप' विरुद्ध भाजप अशीच होईल, आयकर विभागाच्या छाप्यानंतर मनीष सिसोदिया यांची प्रतिक्रीया)
याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत अटक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, केंद्र सरकार दिल्लीत शिक्षण क्षेत्रात केलेल्या मोठ्या कामाला ब्रेक लावू इच्छित आहे. त्यामुळेच मला 2-4 दिवसांत अटक होऊ शकते. दरम्यान, सीबीआयने सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी केले आहे. हे लूकआउट परिपत्रक सिसोदिया यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता हे लोक देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसेच त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांना ताब्यातही घेतले जाऊ शकते.