Kanpur: पत्नी माहेरहून घरी न परतल्याने संतापलेल्या पतीने सासरी जाऊन सगळ्यांच दिले पेटवून

पत्नीने घरी येण्यास नकार दिला म्हणून संतापलेल्या पतीने सासरी जाऊन सगळ्यांच जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात पत्नीसह 8 जण गंभीररित्या जळाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथील रामपुरवा भागात घडली आहे.

Kanpur: पत्नी माहेरहून घरी न परतल्याने संतापलेल्या पतीने सासरी जाऊन सगळ्यांच दिले पेटवून
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पत्नीने घरी येण्यास नकार दिला म्हणून संतापलेल्या पतीने सासरी जाऊन सगळ्यांच जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  यात पत्नीसह 8 जण गंभीररित्या जळाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथील रामपुरवा भागात घडली आहे. या घटनेची शेजाऱ्यांना माहिती मिळताच तात्काळ आग विझवण्यात आली. सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुकेश कुमार आरोपीचे नाव असून तो ट्रक चालक आहे. त्याचे गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी मनिषा हीरालाल नावाच्या महिलेसोबत विवाह झाला होता. मुकेशला दारूचे व्यसन होते. ज्यामुळे मुकेश आणि मनिषा त्यांच्यात वारंवार वाद होत असे. यामुळे लॉकडाऊनच्या आधी आपल्या माहेरी निघून आली. त्यानंतर मुकेश अनेकदा मनिषा घरी येण्याची विनंती केली. मात्र, मनिषा त्याच्यासोबत जण्यास तयार नव्हती. यावर संतापलेल्या मुकेश शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास पाच लीटरचा कॅन घेऊन सासरी पोहचला. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा मनिषाला घरी येण्याचा आग्रह केला. मात्र, तिने नकार देताच त्याने सर्वांना जिवंत जाळण्याची धमकी दिली. तसेच त्याने मनिषाच्या घराचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर दरवाजा खालून पेट्रोल ओतून आग लावून पळून गेला. याबाबत गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्वांनाचा आगीतून बाहेर काढले. परंतु, या आगीत 8 जण भाजल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! लॉलीपॉप आणि कँन्डी मध्ये टॅल्कम पावडरची भेसळ केली जात असल्याचा प्रकार उघडकीस

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुकेश हा फरार असून स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या आगीत मुकेशचा दीड वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2021 11:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).